शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा रुग्णालयात; 'हिटमॅन'ला अचानक काय झालं? Viral Video मुळे फॅन्स चिंतेत
2
कुर्डूतील मुरुम उपसा बेकायदाच, IPS अंजना कृष्णा यांनी केलेली कारवाई योग्य; जिल्हाधिकाऱ्यांनीच सांगितलं सत्य
3
सी. पी. राधाकृष्णन की बी. सुदर्शन रेड्डी, भारताचे १५ वे उपराष्ट्रपती कोण होणार? आज निवडणूक
4
GEN-Z च्या आंदोलनापुढे नेपाळ सरकार झुकले; सोशल मीडियावरील बंदी उठवली
5
केंद्र सरकारने रोखले पीएम किसानचे मानधन; दोघांच्या नावे शेती असल्यास पत्नीलाच मिळेल लाभ
6
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५, नशिबाची साथ लाभेल, परदेशातून शुभ समाचार मिळतील
7
अग्रलेख: चिमुकल्यांच्या जिवाशी खेळ; प्रश्नांकडे दुर्लक्ष ही धोरणात्मक चूक
8
नेपाळच्या संसदेत घुसली तरुणाई, प्रचंड तोडफोड-जाळपोळ; सैन्याचा आंदोलकांवर गोळीबार
9
विशेष लेख:बिहारचे मैदान तापले; सर्वांच्या अस्तित्वाची लढाई!
10
हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी १७ सप्टेंबरपूर्वी करा, अन्यथा...; जरांगेंनी थोपटले दंड, ओबीसी समाज आक्रमक
11
लेख: माणूस १०० वर्षांपलीकडे आपले आयुष्य वाढवू शकतो का?
12
आधार हा नागरिकत्वाचा नाही तर ‘ओळखी’चा पुरावा; १२ वे दस्तावेज म्हणून ग्राह्य धरा, सुप्रीम कोर्टाचे निर्देश 
13
जीपच्या धडकेत तिघे ५० फूट फेकले, पती-पत्नीसह एक वर्षाचा चिमुकला ठार
14
Navratri 2025: तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्रीला १४ सप्टेंबरपासून सुरुवात
15
संयम अन् सकारात्मकतेमुळे इथवर आलो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उलगडले गुपित
16
जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे चकमक; दोन अतिरेकी ठार
17
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
18
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
19
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
20
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना

ध्येयवेड्या सरपंचांना ‘लोकमत’मुळे बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 00:17 IST

सांगली : ‘लोकमत अवॉर्डस्’ची ताणलेली उत्सुकता, गावा-गावांतून सहकाºयांसमवेत आलेले उत्साही सरपंच, पुरस्काराच्या घोषणेनंतर होणारा टाळ्यांचा कडकडाट, पुरस्कारप्राप्त सरपंचांवर होणारा शुभेच्छांचा वर्षाव, त्यांच्या नातेवाईक, कुटुंबियांची अभिमानाने उंचावलेली मान... अशा उत्साही वातावरणात सांगलीत शुक्रवारी जिल्हास्तरीय ‘लोकमत सरपंच अवॉर्डस्’ सोहळा दिमाखात पार पडला. ‘लोकमत’ने केलेल्या सन्मानामुळे ध्येयवेड्या सरपंचांना प्रोत्साहन मिळेल. ग्रामविकासाबाबत जागृतीस मदत ...

सांगली : ‘लोकमत अवॉर्डस्’ची ताणलेली उत्सुकता, गावा-गावांतून सहकाºयांसमवेत आलेले उत्साही सरपंच, पुरस्काराच्या घोषणेनंतर होणारा टाळ्यांचा कडकडाट, पुरस्कारप्राप्त सरपंचांवर होणारा शुभेच्छांचा वर्षाव, त्यांच्या नातेवाईक, कुटुंबियांची अभिमानाने उंचावलेली मान... अशा उत्साही वातावरणात सांगलीत शुक्रवारी जिल्हास्तरीय ‘लोकमत सरपंच अवॉर्डस्’ सोहळा दिमाखात पार पडला. ‘लोकमत’ने केलेल्या सन्मानामुळे ध्येयवेड्या सरपंचांना प्रोत्साहन मिळेल. ग्रामविकासाबाबत जागृतीस मदत होईल, अशी भावनाही मान्यवरांनी यावेळी व्यक्त केली.या सोहळ्यासाठी राज्याचे निवृत्त अतिरिक्त मुख्य सचिव नानासाहेब पाटील, पंचायत राज समितीचे माजी अध्यक्ष, आमदार शिवाजीराव नाईक, बीकेटी टायर्सचे जनरल मॅनेजर शशिकांत पाटील, असिस्टंट जनरल मॅनेजर (मार्केटिंग) अमनदीप सिंग, असिस्टंट मॅनेजर (सेल्स) जुबेर शेख, महिंद्रा अ‍ॅन्ड महिंद्राचे टेरिटरी मॅनेजर अमोल तोरडमल, स्वप्नपूर्ती मोटर्सचे सीईओ हेमंत भावसार, ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले, वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, सांगलीचे आवृत्तीप्रमुख श्रीनिवास नागे, शाखा व्यवस्थापक विक्रम हसबनीस यांची प्रमुख उपस्थिती होती.‘लोकमत’चे संस्थापक श्रद्धेय जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन करून व दीपप्रज्ज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. माधवनगर रस्त्यावरील डेक्कन मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे सभागृह सरपंच, सदस्य व ग्रामस्थांनी खचाखच भरले होते. या स्पर्धेसाठी जिल्ह्याच्या कानाकोपºयातून ३२५ प्रस्ताव ‘लोकमत’ कार्यालयाकडे प्राप्त झाले होते. जिल्हास्तरावरील पुरस्कारांची निवड करण्यासाठी माजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी महालिंग जाधव, सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी एन. बी. पाटील, महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती छाया खरमाटे, प्रा. सुभाष दगडे, प्रा. डॉ. विजय पाटील, शिवाजी विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजनेचे माजी कार्यक्रम समन्वयक प्रा. संजय ठिगळे या तज्ज्ञांच्या ज्युरी मंडळाने प्रत्येक नामांकनाची छाननी करून विजेत्यांवर मोहोर उमटवली होती. रेखा गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले.‘लोकमत’ने सन्मानित केलेले विजेते सरपंचसंदीप सीताराम पाटील, अंजनी (ता. तासगाव)सौ. रेश्मा विजय शितोळे, चुडेखिंडी (कवठेमहांकाळ)नंदाताई पाटील, कासेगाव(ता. वाळवा)धनंजय पाटील, भिलवडी(ता. पलूस)अशोक मारुती कुंभार, कामेरी (ता. वाळवा)विजय महाडिक, भटवाडी( ता. शिराळा)बाळासाहेब पाटील, पेड (ता. तासगाव)संजय दत्तात्रय विभुते, माडगुळे (ता. आटपाडी)सौ. कविता बोंद्रे, हरिपूर (ता. मिरज)तानाजी पाटील, बलवडी खा. (ता. खानापूर)सौ. मनीषा कांबळे, वांगी (ता. कडेगाव)सौ. सलिमा मुल्ला, पांडोझरी (ता. जत)